लहान कडबा कुट्टी मशीन [lahan kadaba कुट्टी mashin ]

मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत ती सागर कंपनीची कडबा कुट्टी मशीन. मित्रांनो आपण सध्या काय करतो गुरांना वैरण खायला देतो किंवा त्यांच्या पुढ्यात टाकत असतो. गुरे कोवळे शेंडे तसेच पाला आणि लहान काड्या निवडून खातात आणि जाड जाड भाग तसाच राहत असतो.पण गुरे वैरण खात असताना ते पूर्ण खात नाहीत किंवा ते पूर्ण संपवू शकत नाहीत त्यामुळे त्यांना टाकलेली काही वैरण खराब होते. त्याच्यावर पर्याय म्हणून वैरण चे बारीक बारीक तुकडे करून ते गुरांना खायला देणे. वैरणी चे बारीक तुकडे करणाऱ्या कडबा कुट्टीची आपण माहिती घेणार आहोत. कडबा कुट्टी आहे सागर अग्रो सेल्स या कंपनीची. त्यांचं नाव मोबाईल नंबर आणि ऍड्रेस खाली दिलेला आहे.आपण व्यवस्थित सुट्ट्या भागापासून माहिती घेऊया आणि ते भाग आपण पुढील प्रमाणे पाहू. 1. मोटर ...