लहान कडबा कुट्टी मशीन [lahan kadaba कुट्टी mashin ]
मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत ती सागर कंपनीची कडबा कुट्टी मशीन. मित्रांनो आपण सध्या काय करतो गुरांना वैरण खायला देतो किंवा त्यांच्या पुढ्यात टाकत असतो. गुरे कोवळे शेंडे तसेच पाला आणि लहान काड्या निवडून खातात आणि जाड जाड भाग तसाच राहत असतो.पण गुरे वैरण खात असताना ते पूर्ण खात नाहीत किंवा ते पूर्ण संपवू शकत नाहीत त्यामुळे त्यांना टाकलेली काही वैरण खराब होते. त्याच्यावर पर्याय म्हणून वैरण चे बारीक बारीक तुकडे करून ते गुरांना खायला देणे.
वैरणी चे बारीक तुकडे करणाऱ्या कडबा कुट्टीची आपण माहिती घेणार आहोत. कडबा कुट्टी आहे सागर अग्रो सेल्स या कंपनीची. त्यांचं नाव मोबाईल नंबर आणि ऍड्रेस खाली दिलेला आहे.आपण व्यवस्थित सुट्ट्या भागापासून माहिती घेऊया आणि ते भाग आपण पुढील प्रमाणे पाहू.
1. मोटर 2. बेल्ट 3.पाते 4. व्हील 5. लाटी 6. क्षमता 7. कार्य
1) मोटर
मशीनचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मोटर. त्यासाठी तीन एचपी सिंगल फेज मोटर वापरण्यात आलेली आहे तसेच मोटरम तांब्याच्या तारेची वाइंडिंग वापरलेली असून तिला सहा महिन्यांची वॉरंटी देण्यात आलेली आहे. तीस ते पस्तीस किलो वजनाची मोठी हेवी मोटर वापरण्यात आलेली आहे त्यामुळे कुट्टी व्यवस्थित चालते आणि जास्त लोड येत नाही.
2)बेल्ट
मोटरची पुल्ली आणि कुट्टी करण्यासाठी फिरवले जाणारे पाते यासाठी बी.९६ नंबरचा बेल्ट वापरण्यात आला आहे हा बेल्ट आय. एस. आय. मार्क चा आहे आणि तो चांगल्या गुणवत्तेचा बेल्ट वापरण्यात आला आहे.
3)चाक
मोठ्या आकाराच्या चाकामुळे तसेच त्यावर बसवलेल्या पात्यामुळे वैरण कट होते. मोटरच्या साह्याने हे चाक फिरवले जाते.
4)पाते
यासाठी दोन पाती वापरली जातात परंतु दोन-पाती जोडली तर कुट्टी एकदम लहान होते म्हणून एकच पाते वापरले जाते त्यामुळे कुट्टी गुरांना खाता येते ते पाते टाटा कंपनीचे आणि पुजारी कंपनीची वापरली जातात.
5)लाटी
लाटी म्हणजे दात असलेले गिअर. हे गियर वापरले जातात वैरण आत ओढण्यासाठी. यासाठी तीन लाटी वापरलेल्या आहेत. या लाटी लोखंड आणि बिडाच्या बनवलेल्या असतात. गियर च्या मदतीने या फिरवल्या जातात.
6)क्षमता
या मशीनची कुट्टी करण्याची क्षमता तासाला ५०० किलो कुट्टी करते. म्हणजेच साधारण १० ते ११ गु्रांसाठी ही मशीन व्यवस्थित चालते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा