माझी जिवनगाथा

              मित्रहो नमस्कार मी विठ्ठल भिवा वाघमारे  माझा जन्म भटुंबरे या छोट्याशा गावी झाला. पंढरपूर पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर माझे गाव आहे.माझ्या कुटुंबांमध्ये मी माझा लहान भाऊ आणि माझ्यापेक्षा मोठ्या सहा बहीणी,आई आणि वडील असे आमचे कुटुंब.
     
              अत्यंत हलाखीची परिस्थिती होती आमची मला जेव्हा समजत होते तेव्हापासून मी पाहत होतो की आई वडिल आणि चार बहीणी आम्ही सर्वजण विटा तयार करण्यासाठी परगाव जात असे. वर्षानुवर्ष हाच व्यवसाय चालत आलेला. चार महिने गावामध्ये आणि आठ महिने परगावी कामासाठी पावसाळ्यात आमची आई गवत विकायची आणि आम्हाला जगवायची. वडीलांना दारूचे व्यसन होते. 
              
              असेच दिवस जात होते आम्ही मोठे झालो १ली ते ४थी.
पर्यंत शिक्षण झाले आईने गवत विकून मोठ्या शर्थीने आम्हाला शाळा शिकवली. परंतु आम्ही त्यांना त्याचा मोबदला देवू शकलो नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लहान कडबा कुट्टी मशीन [lahan kadaba कुट्टी mashin ]

विट्टभट्टी एक यशस्वी व्यवसाय

ग्रामपंचायत स्थानिक स्वराज संस्था