ग्रामपंचायत स्थानिक स्वराज संस्था
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत आणि तिच्या कार्याविषयी माहिती.
आपल्या देशामध्ये शहरांपेक्षा लहान लहान खेडी जास्त आहेत. आणि या खेडेगावाचा सर्व कारभार ही ग्रामपंचायत पाहते. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज संस्था आहे. यामध्ये सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचा प्रमुख सहभाग असतो. इतर सदस्यही असतात परंतु सरपंच हा कार्यकारी प्रमुख असतो.
ग्रामपंचायत ही 'मुंबई ग्रामपंचायत कायदा कलम' या कायद्यान्वये चालते. ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावाची लोकसंख्या किमान 600 इतकी असावी लागते. जर डोंगर भाग असेल तर तिथे याचे प्रमाण 300 आहे. तसेच यातील सदस्य संख्या कमीत कमी 7 आहे. आणि जास्तीत जास्त 17 असून ती लोकसंख्येवर निश्चित होते.
ग्रामपंचायत कायाद्यातील कलमे :
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी.
1.गावातील लोक लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदानाने निवडतात.
2. सादर सद्यस्यांचे मतदान हे प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीने होईल.
3. आरक्षण :
अ) महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
ब) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत क) इतर मागासवर्गीय घटकांसाठी 27% जागा आरक्षित आहेत.
4. सदस्य पात्रता :
1. ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा सदस्य असावा.
2. त्याच्या वयाची 21 वर्षे पूर्ण असावी.
3. मतदार यादीत त्याचे नाव असणे आवश्यक असते.
5. मुदत :
ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत ही पाच वर्षांची असते.जर एखादी ग्रामपंचायत बरखास्त झाली तर सहा महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक असते. ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्यशासनास आहे. जर निम्यापेक्षा जास्त सदस्यांनी राजीनामा दिला तर पोटनिवडणूक घेण्याचा निर्देश किंवा बरखास्तीचा निर्णय राज्यशासन देते.
सरपंच उपसरपंच :
ग्रामपंचायत्तीमध्ये सरपंच हा कार्यकारी प्रमुख असतो. त्याची निवड निवडून आलेल्या सदस्यापैकी होते. किंवा सदस्यांच्या एकमताने आपल्यापैकी एकजणाला निवडले जाते. परंतु 2017 पासून सरपंचची निवड ही डायरेक्ट जनतेतून केली जाते. सध्या सरपंच हे पद आरक्षित केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अगोदर सोडत काढली जाते. उपसरपंच पद हे खुले आहे.
अविश्वास ठराव :
सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी एकूण सदस्यांच्या 1/3 सदस्यांनी तो मांडावा लागतो. तशी सूचना तहसीलदाराला मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत तहसीलदार ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवतो.त्याच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार असतो. आणि त्या सभेमध्ये हा ठराव 2/3 बहुमताने पारित झाला तर त्यांना सरपंच व उपसरपंच पदाचा राजीनामा द्यावा लागतो. महिला सरपंच्यासाठी हा ठराव मंजूर होण्यास 3/4बहुमत असणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायत्तीमध्ये सरपंचला अनेक अधिकार दिले आहेत. ग्रामपंचायतीचे बजेट तयार करण्याचा अधिकार यापासून ते विविध ग्रामविकास सदस्यांचे अध्यक्षस्थान सरपंचला बहाल केले आहे. शासनाने सरपंचला काही कवच कुंडले प्रदान केली आहेत.
1. पहिले दोन वर्षे सरपंचावर अविश्वास ठराव आणता येत नाही.
2. दोन वर्षांनी 75% किंवा त्याहून अधिक ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर केला तरीही सरपंच पद जात नाही. त्यासाठी या अविश्वास प्रस्तावला विशेष ग्रामसभेत गुप्त मतदानद्वारे संमती मिळायला हवी.
ग्रामसेवक :
ग्रामसेवक हा ग्रामपंचायतिचा मुख्य कार्यकारी अधिकारी, सचिव, सरचिटणीस या नावाने ओळखतात. ग्रामसेवकाची निवड जिल्हा परिषदेकडून होते. व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात ग्रामसेवकावर्ती गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण असते.
ग्रामसेवकची कामे :
1. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे.
2. ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे.
3. आरोग्य, शेती, ग्रामविकास, शिक्षण इत्यादिबाबत गावकऱ्यांना सल्ला देणे. 4. वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे. 5. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील घरे, मोकळी जागा, तसेच व्यवसाय वरील कर वसुल करणे. 6. विविध प्रकारचे दाखले देणे. 7. जन्म, मृत्यू, उपजत मृत्यू नोंदणी निबंधक अधिकारी म्हणून काम पाहणे. 8. बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून काम पाहणे. 9. मंजूर नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहणे, 10. बांधकान कामगार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहणे. 11. जनमाहिती अधिकारी कामकाज पाहणे.
ग्रामपंचायतीचे उत्पन्न : 1. ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागेवत कर आकारने. 2. व्यवसाय कर, यात्रा कर जाणवरांच्या खरेदी वक्रीवरील कर 3. जमीन महसूलच्या प्रमाणात राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान
4. विकासकामासाठी जिल्हा परिषदेकडून दिले जाणारे अनुदान.
ग्रामपंचायत कामे :
1. गावातील रस्ते बांधणे. तसेच दुरुस्ती करणे. 2. दिवाबत्तीची सोय करने 3. जन्म, मृत्यू, व विवाह याची नोंद ठेवणे. 4. सांडपाण्याची व्यवस्था करणे. 5. सार्वजनिक स्वच्छता ठेवणे. 6.पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. 7. शिक्षण तसेच आरोग्यविषयक सोयी पुरवणे. 8.शेती विकासाच्या व पशुधन सुधारण्याच्या योजना आमलात आणणे. 9. गावचा बाजार, जत्रा, उत्सव, उरूस याची व्ययस्था करणे. 10. ग्रामपंचायत हद्दीतील येणारे कर व शासनाकडून येणारा निधी याचा योग्य त्या ठिकाणी वापर करणे.
ग्रामपंचायतिची प्रत्येक महिन्याला एक अशा वर्षातुन 12 बैठका बोलवल्या जातात. गावामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणतेही कारण देऊन बैठक बोलावली जाते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा