पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझी जिवनगाथा

              मित्रहो नमस्कार मी विठ्ठल भिवा वाघमारे  माझा जन्म भटुंबरे या छोट्याशा गावी झाला. पंढरपूर पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर माझे गाव आहे.माझ्या कुटुंबांमध्ये मी माझा लहान भाऊ आणि माझ्यापेक्षा मोठ्या सहा बहीणी,आई आणि वडील असे आमचे कुटुंब.                     अत्यंत हलाखीची परिस्थिती होती आमची मला जेव्हा समजत होते तेव्हापासून मी पाहत होतो की आई वडिल आणि चार बहीणी आम्ही सर्वजण विटा तयार करण्यासाठी परगाव जात असे. वर्षानुवर्ष हाच व्यवसाय चालत आलेला. चार महिने गावामध्ये आणि आठ महिने परगावी कामासाठी पावसाळ्यात आमची आई गवत विकायची आणि आम्हाला जगवायची. वडीलांना दारूचे व्यसन होते.                               असेच दिवस जात होते आम्ही मोठे झालो १ली ते ४थी. पर्यंत शिक्षण झाले आईने गवत विकून मोठ्या शर्थीने आम्हाला शाळा शिकवली. परंतु आम्ही त्यांना त्याचा मोबदला देवू शकलो नाही.

जीवनाविषयी पाच मुद्दे

1. स्वतःवर विश्वास ठेवा. 2.प्रत्येक प्रश्नावर उत्तर असतेच त्यामुळे संकटाच्या वेळेस कुणापुढे     भिक मागू नये. 3.सतत कार्यरत रहा कारण संकटाशी झुंज दिल्याशिवाय प्रश्न कसे       सोडवायचे हे कळत नाही. 4.दररोज किमान 1% आपल्यातील चुका सुधारण्यास प्रयत्न करावा. 5.आपल्या जीवनात एक ध्येय ठेवून ते मिळवण्याचा प्रयत्न करावा.