लँडफोर्स रोटावेटर Landforce Rotavator
नमस्कार मिंत्रानो आज आपण माहिती घेणार आहोत अशा आवाजाराची ज्याचा उपयोग आपल्याला शेतीची मशागत करण्यासाठी केला जातो. आपण लँडफोर्स रोटावेटरविषयी माहिती घेऊया. बाजारामध्ये अनेक प्रकारचे रोटर आहेत त्यापैकी एक म्हणजे लँडफोर्स कंपनी. या कंपनीचा रोटर तुम्हाला 3.5 फुटापासून 7.5 फुटापर्यंत रोटर मिळतील. या रोटरची वैशिष्ट्ये आपण पाहूया. 1. मल्टीस्पीड गिअर बॉक्स लँडफोर्स रोटरमध्ये 3.5फुटापासून 7.5 फुटाच्या रोटरला एकच प्रकारचा गिअर बॉक्स वापरला आहे म्हणजे 3.5 फूट रोटरला जो गिअर बॉक्स वापरला आहे त्याच प्रकारचा 7.5 फूट रोटरला वापरला आहे त्यामुळे आतमधील जे गिअर ते सर्वाना वापरता येतात वेगवेगळ्या ट्रॅक्टरचे पी. टी. ओ वेगवेगळ्या आर. पी. एम.चे असतात. गिअर बॉक्समध्ये दोन गिअर असतात. एक लहान आणि दुसरा मोठा. या गिअरबॉक्स द्वारे आपण वेगवेगळ्या स्पीडणे रोटर फिरवू शकतो. पाच ते सहा प्रकारे आपण स्पीड बदलू शकतो. ग...