विट्टभट्टी एक यशस्वी व्यवसाय
नमस्कार मित्रानो आज आपण एका नवीन उदयोगविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक स्वप्न असते ते म्हणजे आपले स्वतःचे एक घर असावे. आणि घर म्हटले कि त्यासाठी लागते वीट तर या विटेच्या उद्योगाविषयीं आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहणार आहोत वीट कशी तयार केली जाते? कोणकोणते मटेरियल वापरले जाते? भट्टीमध्ये वीट कशी भाजली जाते? तिचा व्यवसाय कसा केला जातो? आणि वीट कस्टमर पर्यंत कशी पोहोचवली जाते?
प्रथम आपल्याला या उद्योगासाठी जागा आणि भांडवलची गरज असते. चार पाच गारे म्हटले तर एक एकर जमीन लागते आता तुम्हाला गारे म्हणजे काय पुढे कळेल. विटा तयार करण्यासाठी जो कच्चा माल वापरला जातो, त्यामध्ये माती, बगॅस, बॉयलर राख, दगडी कोळसा आणि पाणी या कच्चा मालाची गरज असते.
विटा तयार करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची माती असावी लागते. ही माती साधारणपणे नदिकाठाची किंवा ओढ्याच्या काठाची असावी लागते. ज्यामध्ये चुखाद किंवा इतर दगड नसावेत. अगदी मऊ चिकन माती असावी लागते. कोणते मटेरियल किती प्रमाणात घ्यायचे याचे प्रमाण ठरलेले असते. माती, बगॅस, राख हे सर्व मिक्स करून त्यामध्ये पाणी मिसळले जाते. आणि चिखल केला जातो. चिखल एक दिवस मुरु दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी विटा तयार करण्यासाठी मळला जातो. विटा पाहिजे त्या साईज मध्ये तयार केल्या जातात साधारनपणे लहान विटेची साईज 3"4"9" आणि मोठ्या विठेची 4"6"9" अशी असते. आपल्याला ज्या साईजची वीट पाहिजे त्या साईजच्या सच्यामध्ये चिखल भरला जातो आणि तो अलगद जमिनीवर पलटी केला जातो. एक गारेकरी दिवसातून एक ते दोन हजार वीट तयार करू शकतो. याला विटा थापने असे म्हणतात.
सकाळी 10ते 12 वाजेपर्यंत विटा थापायचे काम चालू असते. थापालेल्या विटा वाळवल्या जातात. नंतर दोन दिवसांनी त्या विटा उभा करून ठेवल्या जातात. या प्रक्रियेला फड उभा करणे असे म्हणतात. फड उभा केल्या नंतर त्याला आठ दिवस उन्हामध्ये वाळवला जातो. चांगला वाळवाल्यानंतर तो भाजण्यासाठी तयार होतो.
विटा भाजायच्या म्हणजे माती भाजून ती पक्की करायची यामध्ये मदत घेतली जाते ती दगडी कोळशाची. भट्टी तयार करताना प्रथम पक्क्या विटेचा थर लावला जातो. त्यावरती कोळशाचा थर दिला जातो, कोळश्यावरती विटेचे चार थर लावले जातात त्यावरती कोळशाच्या बारीक चुरेचा थर दिला जातो. त्यावरती विटेचे नऊ थर दिले जातात नंतर आणखी मळीचा किंवा चुरीचा थर दिला जातो, शेवट विटेचे पंधरा थर दिले जातात. सर्व मिळून जवळपास आठ्ठावीस थर विटेचे दिले जातात आणि हे प्रमाण कमी जास्त ही असू शकते.
एका भट्टीमध्ये कमीत कमी दहा हजार आणि जास्तीत जास्त कितीही वीटांची भट्टी लावू शकतो. भट्टी लावल्यानंतर तिला सर्व बाजूने पक्क्या विटेने झाकले जाते. वरील बाजूस पक्क्या विटेच्या चुऱ्याचा थर दिला जातो. नंतर भट्टी पेटवली जाते. भट्टी पेटवण्यासाठी भट्टीला मागील बाजूस पाच ते सहा मोऱ्या तयार केल्या जातात. मोऱ्या म्हणजे लाकडे कोळशाच्या थरापर्यंत जाण्यासाठी चूल तयार केली जाते. सर्व चुलीमध्ये लाकडे घ्यातल्यानंतर ती पेटवली जातात. एकदा का कोळशाला आग लागली कि भट्टी पेटली म्हणून समजली जाते.
प्रथम खालचा थर पेटतो आणि नंतर विटा भाजत जाऊन आग वरच्या थरापर्यंत जाते. जर भट्टी पन्नास हजाराची असेल तर तिला भाजण्यासाठी आठ दिवस लागतात. या भट्टीमध्ये सुमारे एक हजार ते पंधराशेच्या आसपास तापमान तयार होते. आठ दिवसामध्ये वीट भाजून तयार होते आणि पुढचे चार दिवस भट्टी थंड होण्यासाठी ठेवली जाते.
मित्रांनो ही माहिती पहिली ती वीट कशी तयार केली जाते परंतु यासाठी भांडवलं किती लागते खर्च किती होतो, कामगारांचा खर्च किती? मातीचे आणि मटेरियलचे प्रमाण किती घ्यायचे? याचे सर्व नियोजन करावे लागते. तसेच हा व्यवसाय कोणत्या दिवसात केला जातो? सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये नफा किती होतो आणि तोटा काय आहे? हे सर्व पुढील भागात पाहू.
धन्यवाद मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा