लँडफोर्स रोटावेटर Landforce Rotavator
नमस्कार मिंत्रानो आज आपण माहिती घेणार आहोत अशा आवाजाराची ज्याचा उपयोग आपल्याला शेतीची मशागत करण्यासाठी केला जातो. आपण लँडफोर्स रोटावेटरविषयी माहिती घेऊया.
बाजारामध्ये अनेक प्रकारचे रोटर आहेत त्यापैकी एक म्हणजे लँडफोर्स कंपनी. या कंपनीचा रोटर तुम्हाला 3.5 फुटापासून 7.5 फुटापर्यंत रोटर मिळतील. या रोटरची वैशिष्ट्ये आपण पाहूया.
1. मल्टीस्पीड गिअर बॉक्स
लँडफोर्स रोटरमध्ये 3.5फुटापासून 7.5 फुटाच्या रोटरला एकच प्रकारचा गिअर बॉक्स वापरला आहे म्हणजे 3.5 फूट रोटरला जो गिअर बॉक्स वापरला आहे त्याच प्रकारचा 7.5 फूट रोटरला वापरला आहे त्यामुळे आतमधील जे गिअर ते सर्वाना वापरता येतात
वेगवेगळ्या ट्रॅक्टरचे पी. टी. ओ वेगवेगळ्या आर. पी. एम.चे असतात. गिअर बॉक्समध्ये दोन गिअर असतात. एक लहान आणि दुसरा मोठा. या गिअरबॉक्स द्वारे आपण वेगवेगळ्या स्पीडणे रोटर फिरवू शकतो. पाच ते सहा प्रकारे आपण स्पीड बदलू शकतो.
गियर बॉक्स रोटरला दोन्ही बाजूनी जोडला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी गिअर बॉक्सला आधार मिळतो.दुसऱ्या कंपनीच्या रोटरला अशा प्रकारचा शाफ्टचा आधार दिला जात नाही.गिअर बॉक्समध्ये १६-२२, १३-१८ अशा प्रकारचे दात असलेले गिअर बसवले जातात.
रोटरला एका बाजूला तीन वेगवेगळ्या अकाराचे गिअर दिलेले आहेत. हे गिअर रोटरला फिरवण्यासाठी गिअर बॉक्स कडून आलेली स्पीड पावर रोटरला पाठवतात. या साइडच्या गिअरमुळे अगदी सहज गतीचे वहन होते. गिअर बॉक्स आणि ट्रॅक्टरला जास्त लोड येत नाही. ज्यामुळे ट्रॅक्टर आणि रोटरची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अशा प्रकारचे गिअर इतर रोटरला न देता चैन दिली जाते.
३. बॉडी
रोटरला दणकट बॉडी वापरली आहे. पूर्ण रोटर उचलण्यासाठी वरील भागावर लहान पट्ट्या नसून जाड प्लेटा वापरण्यात आल्या आहेत, ज्यामुळे रोटरचा सर्व भार या प्लेटावर येतो. कंपनीकडून बॉडीला ६ महिने वारंटी दिली आहे.
६.रोटरची पाते
रोटरला लँड फोर्स कंपनीची पाते येतात. पाते ही बोरॉन स्टील धातूपासून बनवले जातात. विशेष म्हणजे तुम्ही जसे रोटरचाल तसे या पात्याला धार लागत जाते. नट आणि बोल्ट याला 10.9 ची वापरले आहेत अशा प्रकारे सर्व मटेरियल कॉलिटीचे वापरले आहे.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून शेतीची मशागत करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळे अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. या रोटरसाठी सुद्धा शासनाकडून अनुदान मिळते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा