25 ते 30 वयातील तरुणांचे जीवन
मित्रहो नमस्कार चला आज आपण चर्चा करूया आपल्या जीवनाविषयी. मी अशा तरुणांचे हाल आपल्यापुढे मांडत आहे की ज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि त्याचे नुकतेच कॉलेज पूर्ण झालेले आहे आणि तो नोकरीच्या शोधात आहे.
मित्रहो सामान्य कुटुंबात जन्मात आलेल्या तरुणांचे जीवन अतिशय बिकट असते आई-वडील काबाडकष्ट करून शाळा शिकवतात. मुलाचे अंगणवाडी पासून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण होते. पुढे कॉलेजमध्ये मुलगा जातो त्यावेळेस शिक्षणाचा खर्च वाढतो तो कसा बसा आई-वडील व्यवस्था करतात कॉलेज पूर्ण होते.
त्यानंतर मुलगा नोकरी शोधू लागतो. येथून सुरुवात होते मुलाच्या अग्नी परीक्षेची यामध्ये काही पास झाले तर ते पुढे जातात आणि जे पास होत नाही ते मग सुशिक्षित बेरोजगार होतात आणि पडेल ते काम करण्यास चालू करतात.
मित्रहो आपण जेव्हा शाळेत जात असतो शिकत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये समाजामध्ये शेजारीपाजारी तसेच गावांमध्ये आणि आपल्या नातेवाईकांमध्ये एक वातावरण निर्माण झालेले असते आणि त्यामध्ये आपले एक विशेष स्थान निर्माण झालेले असते की आपण काहीतरी मोठे बनणार आहोत आणि आपल्या मनामध्येही पक्के बनलेले असते की आपण बदलणार. परंतु जेव्हा आपण या सर्वातून बाहेर पडतो बाहेरची नोकरी शोधू लागतो तेव्हा आपला सर्व भ्रमनिरास होतो. म्हणावे तशी नोकरी मिळत नाही हवी तशी पगार मिळत नाही नको ते काम लावले जाते कोणाचीही बोलणे ऐकून घ्यावे लागते. कामावरती मन लागत नाही एक एक दिवस जाता जात नाही याचे कारण म्हणजे आपण लहानपणापासूनच लाडात वाढलेले असतो कामाची सवय नसते कोणतीही जबाबदारी नसते घरच्यांना वाटते आपल्या मुलाला मोठी नोकरी लागली तो मोठा साहेब होणार परंतु सर्व भ्रमनिरास होतो मुलाला ते काम नको वाटते म्हणून तो दुसरी नोकरी शोधू लागतो
या वयात घरची जबाबदारी ही अंगावर पडते काम करण्याची इच्छा राहत नाही त्यामुळे मुले डिप्रेशन मध्ये जातात घरी जावे तर घरचे काय म्हणतील काम करावे तर आयुष्यभर कामच करावे लागेल आणि व्यवसाय करावा तर जवळ भांडवल नसते अशा मध्ये भर पडते ती मोठीव्हेशन व्हिडिओची त्यामध्ये ते काहीही विचार न करता सरळ सांगतात जॉब सोडा आणि व्यवसाय करा परंतु इथे पोट भरण्याची मुश्किल आणि व्यवसाय कसा करावा. मोटिवेट होऊन मुले नोकरीही सोडून देतात काहीतरी मोठे करण्याच्या उद्देशाने आहे ती पण नोकरी हातची जाते अनुभव नाही, भांडवल नाही परंतु मनात व्यवसायाची ओढ काही तडजोड करून भांडवल गोळा करतात व्यवसाय चालू करतात पण तो चालत नाही वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो आणि नंतर तो पुन्हा रोड वरती येतो पुन्हा एकदा नोकरीकडे वळतो.
या काळात त्याचे लग्नही झालेले असते घरची संपूर्ण जबाबदारी येऊन पडलेली असते या दिवसांमध्ये काही करून दिवसाला काहीतरी उत्पन्न घरी आलेच पाहिजे असे नाही झाले तर अनेक संकटांना तोंड द्यावे लागते घरी सगळ्यांना उपाशी बसायला लागेल ही एक भीती मनामध्ये असते तसेच लोकही नाव ठेवतील समाजामध्ये आपले हसू होईल नातेवाईकांमध्ये आपले हसू होईल आणि आपल्याला काडीची ही किंमत राहणार नाही अशा विचारांमध्ये तो सतत जगत राहतो.
अशा मध्ये व्यवसाय करायचा म्हटलं तर पुन्हा भांडवल गोळा करणे, व्यवसाय चालवणे, तो चालेल की नाही याची खत्री नसणे आणि नोकरी करायची म्हटले तर वय झालेले असते तर नोकरी मिळाली तर पगार कमी असतो आणि तो कुटुंबाला पुरत नाही अडचण अशी तयार होते की व्यवसाय करता येत नाही आणि नोकरीही लागत नाही मग आज ना उद्या पगार वाढेल अशा मनस्थितीमध्ये तो जगत राहतो झुंज देतो आणि शेवटी त्याला सुशिक्षित बेकार म्हणून गणले जाते.
मित्रांनो लोक म्हणतात काही करा प्रयत्न करा प्रयत्न करा यश तुम्हाला मिळेल परंतु नेमके काय करायचे हेच कळत नाही तर प्रयत्न करूनही काही उपयोग होणार नाही कारण आपल्याकडे जे क्षमता आहे ते वाढवल्याशिवायत काही करता येत नाही आणि ते जर वाढवले असेल वाढवायचे असेल तर आपल्याला पहिल्यापासूनच त्याच्यावरती काम करावे लागते असे कधीही उठून व्यवसाय योग्य नसते कारण आपल्याला त्यावेळेस याविषयी काही अनुभव नसतो त्याच्याविषयी काही माहिती नसते आणि आपण मोटिवेट होऊन काहीतरी करायला जातो आणि नंतर आणि नंतर दुसरेच संकटे येऊन पुढे उभे राहतात ते संकटे सोडवायला जाण्यापेक्षा आपली घरची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली असते अशातच आपल्याला आधी पोट भरण्याची मुश्किल होत असते त्यामध्येच जर ते दुसऱ्याचे आपल्याला देणे झालं तरी ते कर्ज झाला असेल तर तेही पडावे लागते अशी बिकट परिस्थिती आपल्यावर येऊन उभा राहते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा